May 9, 2024

Marathi

थेट बातम्या आणि नवीनतम अद्यतने

  • केजरीवाल यांच्या  जामिनावर उद्या निर्णय
    on May 9, 2024 at 2:30 am

    कथित अबकारी धोरण घोटाळय़ाशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनाचा निर्णय आता शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात होईल. या प्रकरणी काल सुनावणी अनिर्णित राहिल्याने खंडपीठ कोणतेही निर्देश न देताच उठले होते. या खंडपीठाचे नेतृत्व करणारे न्या. संजीव खन्ना यांनीच अंतरिम जामिनाविषयी शुक्रवारी आदेश दिला जाईल, अशी माहिती आज दिली. आम्ही शुक्रवारी अंतरिम

  • मोदींच्या धोरणांमुळे भेदभावाने गाठली अभूतपूर्व पातळी, सोनिया गांधी यांनी डागली तोफ
    on May 9, 2024 at 2:14 am

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेतू आणि नीतीधोरणांमुळेच आदिवासी, दलित, गरीब आणि अल्पसंख्याकांमध्ये भेदभावाने अभूतपूर्व पातळी गाठली आहे. सर्वसमावेशकता आणि संवाद नाकारून त्यांना सत्ता स्थापन करायची आहे, अशा शब्दांत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर तोफ डागली आहे. खोटे आणि द्वेषाचे राजकारण करणाऱयांना नकार देऊन देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी काँग्रेस आणि इंडिया आघाडीला मत द्या,

  • ‘अपना सपना मनी मनी’चे दिग्दर्शक संगीत सिवन यांचे निधन
    on May 9, 2024 at 2:09 am

    ‘क्या कूल है हम’, ‘अपना सपना मनी मनी’, ‘यमला पगला दिवाना 2’ या चित्रपटांचे दिग्दर्शक संगीत सिवन यांचे बुधवारी मुंबईत निधन झाले. ते 61 वर्षांचे होते. त्यांच्या जाण्याने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. लेखक, दिग्दर्शक संगीत सिवन यांनी बॉलिवूडसह साऊथ इंडस्ट्रीत देखील नशीब आजमावले होते. त्यांनी मोहनलाल यांच्यासोबत ‘योद्धा’, ‘गंधर्वम’ आणि ‘निर्णयम’ या तीन चित्रपटांमध्ये दिग्दर्शक

  • सतीश चव्हाण यांचे अपघाती निधन
    on May 9, 2024 at 2:07 am

     शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे लोकमान्य नगर मध्यवर्ती शाखेचे शाखाप्रमुख सतीश चव्हाण यांचे अपघाती निधन झाले. त्यांचे वय 59 वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर वागळे इस्टेट येथील वैपुंठभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी पदाधिकारी, शिवसैनिक व विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

  • 4 कोटी 85 हजारांची रोकड जप्त ; आयटी विभाग करणार तपास  
    on May 9, 2024 at 2:06 am

    पवई पोलिसांनी मंगळवारी रात्री नाकाबंदी दरम्यान एटीएमच्या गाडीतून सुमारे 4 कोटी 85 लाख 62 हजार 600 रुपयांची रोकड जप्त केली. याचा पुढील तपास आयकर विभाग करत आहे. आयकर विभाग पोलिसांना अहवाल देणार आहे. त्या अहवालानंतर पोलीस पुढील कारवाई करणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या काळात अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. पोलिसांनी खास नाकाबंदी

  • शिवसेना आणि धनुष्यबाण मोदी-शहांनी दिल्याचे मिंधेंनी कबूल केले, आता चोराला शिक्षा झालीच पाहिजे! – उद्धव ठाकरे
    on May 9, 2024 at 2:00 am

    शिवसेना आणि धनुष्यबाण दिल्याबद्दल मिंधेंनी नरेंद्र मोदी आणि अमित शहांचे आभार मानले आहेत. त्यामुळे निवडणूक आयोग आणि लवादाच्या सुनावण्या बिनावण्या हे सगळं नाटक होतं, हे स्पष्ट झालं आहे. चोराने स्वतःच्या तोंडाने कबुली दिली असून सर्वेच्च न्यायालयामध्ये हा फार मोठा पुरावा झाला आहे. आता या गुह्याची शिक्षा दिली गेलीच पाहिजे, असे नमूद करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव

  • मतदानाची टक्केवारी 11 दिवसांनी कशी बदलली? इंडिया आघाडीचे शिष्टमंडळ आज राष्ट्रपतींना भेटणार
    on May 9, 2024 at 1:59 am

    लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यांत झालेल्या मतदानाच्या टक्केवारीवरून संशय निर्माण झाला आहे. मतदानाच्या दुसऱया दिवशी अंतिम आकडेवारी दिली असताना 11 दिवसांनंतर सुधारित आकडेवारी देण्यात आल्याने त्यावर विरोधी पक्षांनी जोरदार आक्षेप घेतला असून हाच मुद्दा घेऊन इंडिया आघाडीच्या नेत्यांचे शिष्टमंडळ उद्या राष्ट्रपती भवन येथे राष्ट्रपतींची भेट घेणार आहे. पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला मतदान झाले तर दुसऱया

  • कुछ तो गडबड है… मोदीच म्हणतात, अदानी, अंबानींनी निवडणुकीत टेम्पो भरून काळा पैसा वाटला!
    on May 9, 2024 at 1:58 am

    अंबानी-अदानींसाठी पायघडय़ा घालणाऱया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सूर अचानक बदलला आहे. आज जाहीर सभेत काँग्रेस आणि राहुल गांधी यांना लक्ष्य करताना मोदींनी थेट अंबानी-अदानींवर काळ्या पैशांवरून गंभीर आरोप केला. निवडणुका जाहीर झाल्यापासून राहुल गांधी यांनी अंबानी-अदानींना शिव्या देणं बंद केलंय, असा दावा करत, ‘असं का? त्यांच्याकडून किती वसूल केलेत? तुमच्याकडे किती काळा पैसा आहे. टेम्पो

  • अजित पवारांच्या अडचणींत वाढ, शिखर बँक घोटाळय़ाची सीबीआय चौकशीसाठी हायकोर्टात याचिका
    on May 9, 2024 at 1:57 am

    साखर कारखान्यांच्या नावाने कर्ज काढून नंतर हे कारखाने बुडीत असल्याचे दाखवून विकायचे, अशा अनोख्या महाराष्ट्र स्टेट कॉ. बॅंकेच्या (एमएससी) 25 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा तपास सीबीआयकडून करावा, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे बॅंकेचे संचालक होते. संचालक मंडळाने कर्ज मंजूर केले होते. या याचिकेमुळे अजित पवार यांच्या अडचणीत वाढ

  • सैनी सरकार काँग्रेसने पाडावे, आम्ही मदतीला तयार; भाजपचा हिशोब चुकता करण्यासाठी जेजेपी आक्रमक
    on May 9, 2024 at 1:56 am

    तीन अपक्ष आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्यामुळे अल्पमतात आलेले हरयाणातील भाजपचे नायबसिंग सैनी सरकार पाडण्यासाठी काँग्रेसने शेवटचा दे धक्का द्यावा, आम्ही पाठिंबा द्यायला तयार असल्याचे जननायक जनता पक्षाने म्हटले आहे. चौटाला हिशेब चुकता करणार अपक्ष आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्यानंतरही आपले सरकार कोणत्याही अडचणीत नाही, असे सांगणारे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांची बहुमतासाठी कमी पडणाऱया दोन सदस्यांसाठी जेजेपीतील

ताज्या बातम्या, खेळ, टीव्ही, रेडिओ आणि बरेच काही. आईओबी न्यूज नेटवर्क आंतरराष्ट्रीय ते राष्ट्रीय बातम्या, राजकीय ते सामाजिक, संरक्षण ते चालू घडामोडी, तांत्रिक बातम्या ते मनोरंजन बातम्या, प्रत्येक बातम्यांचे कव्हरेज निष्पक्ष, बौद्धिकदृष्ट्या विश्लेषित, विश्वासार्ह आणि विश्वासार्ह आहे.आईओबी न्यूज नेटवर्क माहिती देते, शिक्षित करते आणि मनोरंजन करते – तुम्ही कुठेही असाल, तुमचे वय काहीही असो.